मातोश्रीच्या आवारात मालकासमोर राऊतांनी खुशाल शेपूट हलवावी, पण रस्त्यावर येवून भुंकू नये ; भाजपचा हल्लाबोल
मुंबई : मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे, भाजप नेते संजय पांडे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
ते म्हणाले, मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे. नको तिथं तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला.
बीएमसीच्या चाव्या हातातून गेल्यापासून कंत्राटातली टक्केवारी बंद झालीये. मालक आणि नोकराला फारशी कामं उरली नाहीयेत म्हणून ते इतरांच्या हातातले घड्याळ, गाड्या, पेना पाहत बसलेत.
बीएमसीला भ्रष्टाचारा अड्डा तुम्ही केलं. तुमच्या काळात लोक बीएमसीला ‘बृहन्मुंबई मनी करप्शन’ म्हणायचे.
कोरोना काळात तुम्ही हजारो कोटींची खिचडी खाल्ली, ऑक्सिजन प्लांट खालले, रिमेडिसिव्हर खालले हे सारं कमी होतं म्हणून मुंबईचे रस्ते खाल्ले. अलिबागमध्ये प्रोपर्ट्या घेतल्या. पत्रचाळी प्रकरणात तुरुंगवास भोगून आलेले राऊतांनी भ्रष्टाचारावर बोलणं हस्यास्पद आहे. मुंबई मनपात गोचिडीसारखे घुसुन यांनी मुंबईकरांच्या कष्टाचा, घामाचा पैसा लुटला. २-२ मातोश्री बंगले उभारले. बदल्यात मुंबईकरांच्या हातावर वडापाव ठेवण्याचं काम यांनी केलंय.
२०१९ ला निवडणूक निकालानंतर तुम्ही बाळासाहेबांना सोडून पवारांच्या मांडीवर बसलेत. तेव्हा तुम्ही बाप बदललाची टीका झालीच होती. बाप कोण आणि पोरगा कोण? यावर बोलायला गेलोत तर तुमची खुप अडचण होईल. राऊत बात निकलेगी तो दुर तक जाएगी, एवढंच ध्यानात ठेवून शांत रहावं.
मातोश्रीच्या आवारात मालकासमोर राऊतांनी खुशाल शेपूट हलवावी, पण रस्त्यावर येवून भुंकू नये. नाहीतर मनपाकडे भटके श्वानांना पकडण्यासाठीच्या भरपूर गाड्या आहेत. एक कलानगरला पाठवावी लागेल. असा हल्लाबोल भाजप नेते संजय पांडे यांनी केला आहे.