भाजपच्या रामाला’ सोलापूरच्या ‘नरेंद्र’ची मिळतेय साथ ; भैय्या सर्वत्र डॉक्टर का दिसेना
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची घोषणा थोडी उशिरा झाली असली तरी आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच सोलापुरात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यांनी घोषणा केलेल्या ‘आपकी बार चारसो पार’ त्यामुळे भाजपला देशातील प्रत्येक शीट महत्त्वाची आहे. सोलापुरात स्थानिक आणि ओरिजनल उमेदवाराची मागणी झाली मात्र भाजपने अभ्यासू आणि आक्रमक असणाऱ्या राम सातपुते यांना उमेदवारी दिली. त्यांनी मागील साडे चार वर्षात माळशिरस तालुक्यात अतिशय चांगले काम केले त्याचीच पावती त्यांना मिळाली आहे. आता या भाजपने दिलेल्या रामाला सोलापुरातील सर्वच नेत्यांची साथ मिळणे तितकीच गरजेचे आहे.
सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे पहिल्या दिवसापासून सातपुते यांच्यासोबत खंबीरपणे पाहायला मिळतात. सोलापूर शहरासह आजूबाजूच्या तालुक्यात ही नरेंद्र काळे हे सोबत असतात. सोलापूर भाजप मधील दोन देशमुखातील गटबाजी असताना काळे हे आपली शहराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडताना पाहायला मिळतात. शहरांमधील ज्या भागात सातपुते यांच्या बैठका स्वभावतात त्या ठिकाणी परिस्थितीनुसार नरेंद्र काळे हे भाषण देतात.
आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख हे सुद्धा सोलापूर शहरात राम सातपुते यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात गाठीभेटीत पाहायला मिळत आहेत सातपुतें सोबत भैय्या असल्याने बापूंचे कार्यकर्तेही तितक्या जोमात पाहायला मिळतात. दुसरीकडे सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख हे मात्र कुठेही दिसत नाहीत. याबाबत भाजपच्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता डॉक्टर आपल्या घरगुती कारणामुळे प्रचारांमध्ये दिसत नाहीत परंतु काही दिवसात ते सक्रिय होतील असे सांगण्यात आले.