प्रणिती ताईंची दिल्लीत शपथ, गल्लीत कार्यकर्त्यांचा जल्लोष ; कार्यकर्ते तिरुपतींच्या अशा शुभेच्छा
४२ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या युवा, अभ्यासू, अनुभवी, एकनिष्ठ, पहिल्या महिला खासदार, प्रणितीताई शिंदे यांना शुभेच्छा…..!!!
बदल गरजेचा होता. अशी माणसे निवडून येणे ही काळाची गरज होती. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवारास मतदान केले, असे कार्यसम्राट आमदार कु. प्रणितीताई शिंदे आत्ता खासदार पदाची शपथविधी घेऊन कारकिर्दीस सुरूवात करत आहेत. अश्या लढाऊ युवा संसदेत गेल्या. याचं खूप समाधान आहे. धन्य ती जनता ज्यांनी या रणरागिणी ला निवडून दिलं.
‘जे का रंजले गांजले..,
त्यासी म्हणे जी आपुले’
या जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाला सार्थ ठरवीत जनवात्सल्याचा वसा घेऊन, जाईजुई विचार मंच च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात करत, जनतेचे मने जिंकत सातत्याने सलग पंधरा वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी, लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे” यांनी आपल्या प्रामाणिक कामाचा जनमानसांवर नेमकां ठसा” उमटवला आहे.
आणि परवाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याच्या डोक्यात जात पात धर्म पंथ कधीच शिरला नाही ज्यांनी गेली पंधरा वर्षे सर्व धर्म समभाव जपत एकोपा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेल्या, विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी खासदार म्हणून प्रणितीताई शिंदे निवडून आल्या.
प्रणितीताई शिंदे यांनी यंदाची निवडणूक अत्यंत जिद्दीनं, स्वकर्तृत्वानं जिंकली आहे. मतदारांपर्यंत पोहचणं, त्यांच्याशी सत्तेत असो अगर नसो गेली पंधरा वर्ष ठेवलेला संपर्क, घेतलेली मेहनत त्यांना यंदा उपयोगात आली. आपल्या कार्यकाळात शहर जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा, जोडलेल्या माणसांचा प्रणितीताई यांनाही लाभ झाला. त्यांनी घेतलेली मेहनत ही दुर्लक्षित करता येणार नाही.
१४० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेत नक्कीच सोलापूरकरांचा, महाराष्ट्राचा आवाज म्हणून काम करतील आणि सरकारला लोकांच्या भल्यासाठी कायदे आणि उपक्रम तयार करण्यात मदत करतील. आपल्या मतदारसंघातील लोकांच्या, रस्ते, पाणी, दळणवळण सुविधा, आरोग्य, ऊर्जा, लाईट, शिक्षण व्यवस्था, तीर्थ क्षेत्र विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, विडी यंत्रमाग, बांधकाम, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, यंत्रमाग उद्योगांचे प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, रेल्वे, विमानसेवा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत संसदेत पाठपुरावा करतील आवाज बुलंद करतील.
ताई, सोलापूर शहर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, इतकंच काय तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करण्याची धमक आणि ताकद तुमच्यात आहे. कठोर परिश्रमाच्या बळावर, नैतिक अधिष्ठानाने, निष्ठावंत विचारांनी, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि भविष्यवेधी ध्येयाने तुम्ही आजपर्यंत यशाची अनेक उत्तुंग शिखरे सर केली आहेतचं. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देण्याची सुवर्णसंधी आपल्याला खासदार म्हणून मिळाली आहे. पुढील पाच वर्षे प्रत्येक क्षण, सोलापूर शहर, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, आणि जिल्ह्यातील नागरीकांच्या हितासाठी काम करणार असा विश्वास आहात. भविष्यात आई जगदंबेच्या कृपेने ताकद मिळावी हीच सदिच्छा!
आपल्या जनकल्याणाच्या कार्यास
लाख-लाख शुभेच्छा!
आपला
तिरुपती परकीपंडला (tp)
प्रमुख:- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬