प्रणिती शिंदेंच्या उत्तर सोलापूर दौऱ्याला उत्साहात सुरुवात ; माने, साठे, हसापुरे, वानकर, पाटील सोबतीला
संविधान वाचवण्यासाठी, गोर गरिबांचे कामे होण्यासाठी कॉंग्रेसला साथ देऊन निवडुन द्या असे आवाहन काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.
शनिवारी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील दौऱ्याला समशापूर या गावातून सुरुवात झाली. सोबत माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, बाजार समितीचे संचालक अमोल पाटील, शिवसेना नेते प्रकाश वानकर, सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते हे प्रमुख नेते या दौऱ्यात यासोबत आहेत.
सध्या कठीण काळातून देश जात आहे, शेतकर्याना ना हमीभाव मिळत नाही, ना गरीबांना रेशन धान्य मिळत आहे, पीक विम्याची पैसे मिळत नाहीत, संजय गांधी निराधार योजना बंद पडली, जातीयवादी पक्ष भाजप सरकार आहे त्यामुळे मी उमेदवार आहे, चोवीस तास तुमचे कामे करेन मला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. समशापुर करून नंदुर, तेलगाव, डोनगाव कडे प्रचार ताफा रवाना झाला.