प्रणिती शिंदेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दिला पूर्ण विराम ; फेसबुकवर टाकलेली पोस्ट होते व्हायरल
सोलापूर : येत्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. सोलापूर भाजपला लोकसभेसाठी यंदा पुन्हा नवा उमेदवार द्यावा लागणार अशी शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा ऐकण्यास मिळते, तशी ऑफर आलेली सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
वाचा : सोलापुरात काँग्रेसच्या आमदार गप्प का?
त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या विषयावर पडदा टाकला. भाजपकडून उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचे ऐकण्यास मिळते. असे असतानाही प्रणिती शिंदे यांच्या प्रवेशाची चर्चा सुरूच होती. मुंबईमध्ये भाजपच्या सोलापुरातील काही स्थानिक मोठ्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन भाजपची ऑफर दिल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे.
दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता कायमचा पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये काँग्रेस हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल, मी काँग्रेसची म्हणून जन्माला आले आणि मरेन पण काँग्रेसची म्हणूनच….