सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर : कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्या अटकेचे पडसाद संपूर्ण देशांमध्ये उमटले असून सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली.
यावेळी पोलिस आणि आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी सर्व आंदोलन करताना ताब्यात घेऊन सदर बजार पोलिस ठाण्याकडे रवाना केले. आचारसंहिता आणि आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईचा आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला.