पोलीस आयुक्तांनी सोलापुरातील या मोर्चा अन् सभेला परवानगी नाकारली !
सकल हिंदु समाज सोलापूरच्या वतीने धार्मीक स्थळावरील भोंग्याच्या विरोधात मोर्चा काढुन सभा घेण्यात येणार होती. सदरचा मोर्चा व सभा रद्द करण्यात आलेली आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने मल्लीकार्जुन मंदीर बाळीवेस टिळक चौक मधला मारुती -कोंतम चौक ते कन्ना चौकापर्यत मोर्चा काढण्यात येवुन, कन्ना चौक या ठिकाणी सभेचे आयोजन करण्याकरीता आयोजकांनी पोलीस परवानगी मागीतलेली होती. त्यानुषंगाने मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, यांनी आयोजकांची बैठक बोलावुन त्यांना, उच्च न्यायालय, मुंबई यांनी ध्वनी प्रदुषण अनुषंगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा – १९८६, व ध्वनी प्रदुषण (विनीयम व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतुदीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात धार्मीक स्थळावरील भोंग्यावर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मीक स्थळांवर पोलीसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत अवगत केले व सदरील कार्यवाही यापूढेही सुरु राहणार असल्याबाबत अवगत केले.
तसेच सध्या नवरात्र उत्सव सुरु असल्याने सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागु असून यावेळेस मोर्चाचे आयोजन करणे उचित ठरणार नाही. या पोलीसांच्या सुचनांकडे आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद देवून पोलीस सध्या करीत असलेल्या कार्यवाहीवर समाधान व्यक्त करुन सदरील मोर्चा रदद करित असल्याचे जाहिर केले आहे. तरी सदर दिवशी कोणीही मोर्चा व सभेकरीता जमा होवु नये. असे लोकांना अवाहन करण्यात येत आहे.