हे फक्त आमदार सुभाष देशमुखच करु शकतात….!
सोलापूर : श्री सिद्धेश्वर वनविहार एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या जैव विविधता उद्यानाला नागपूरच्या इको टुरिझम बोर्डाकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रस्तावित असलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे.
तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर निधीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे.याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्यातील ३३ ठिकाणी निसर्ग पर्यटन करण्याला मान्यता दिली. त्यात नेहरूनगर येथील श्री सिद्धेश्वर वनविहाराचाही समावेश आहे. जैव विविधता जपणारे निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ८ कोटी ९५ लाख ७० हजार रुपयांच्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आता नव्या प्रकल्पामुळे या परिसराचे रुपडे बदलून निसर्ग पर्यटन होणार आहे.
हे पण वाचा : महीला सरपंच व तिचा पती लाच घेताना अटक
नव्याने होणाऱ्या वनविहारात आठ कोटी ९५ लाख ७० हजारांतून साकारण्यात येणाऱ्या निसर्ग पर्यटनांमध्ये विविध १६ प्रकारची कामे होणार आहेत. यामध्ये अमृत वन, बेल वन, पंचायत राज वन, कडुनिंब वन, फिक्स वन, लता वन, गणेश वन, नक्षत्र वन, कॅक्टस वन, हिरवा बोगदा, बांबू गॅझेबो, सौर यंत्रणा, टेलीस्कोपीक झोपडी, बॅटरीवर चालणारी वाहने, विद्यान व्याख्यान केंद्र यासह विविध कामे होणार आहेत.
लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरवात होईल : आ. देशमुख
श्री सिद्धेश्वर वनविहारात निसर्ग पर्यटन उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. आता मान्यता मिळाली आहे. शासनाकडून या आराखड्याला निधी मंजूर करून घेण्यात येईल. त्यानंतर लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरवात होईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.