एकटी पाटलीन नडली, पोलीस आणि निवडणूक यंत्रणेशी ! त्या 19 जणांना अखेरपर्यंत मतदान करूच दिले नाही
सोलापूर : एका विशिष्ट समाजाचे आणि परप्रांतीय असल्याच्या संशयावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव इथल्या 19 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. ते 19 जण पुन्हा विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी गावात आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांनी त्या 19 जणांना शेवटपर्यंत मतदान करूच दिले नाही. एकटी पाटलीन पोलीस प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेची अखेरपर्यंत नडल्याचे सांगण्यात आले.
भोगाव मध्ये त्या समाजाचे एकही घर नसताना 34 नावे मतदार यादीत कशी काय आली हा प्रश्न घेऊन उज्वला पाटील या मागील सात महिन्यांपासून जिल्हा प्रशासना सोबत भांडत आहेत. हा विषय या भागाचे आमदार यशवंत माने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता. शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले आणि या मतदार यादीतील १९ जणांची नावे वगळण्यात आली. असे पत्र त्यांना प्रांत अधिकारी मोहोळ यांच्याकडून मिळाले.
उर्वरित नावे सुद्धा गावातील स्थानिक लोकांची नाहीत त्यांची ही नावे मतदार यादीतून वगळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले या मतदानावेळी परत ती 19 लोक मतदानासाठी आले. त्यांची नावे या यादीत आहे तशीच होती.
त्यावेळेस उज्वला पाटील यांना हे समजल्यानंतर त्यांनी त्या 19 जणांना मतदानापासून रोखले, संबंधित नावे वगळल्याचे पत्र घेऊन त्या निवडणूक अधिकाऱ्यांची भांडत राहिल्या. तेव्हा निवडणूक यंत्रणेने पोलिसांना बोलावून घेतले. तरीही पाटील यांनी हार मानली नाही. मतदान संपेपर्यंत त्या पोलिस आणि निवडणूक यंत्रणेशी नडल्या. अखेरपर्यंत त्या 19 जणांना त्यांनी मतदान करूच दिले नसल्याचे समजले. ही माहिती जेव्हा भोगावच्या चौफेर पसरली तेव्हा त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.