सोलापूर जिल्ह्यात आता महिला ही चालवणार ट्रॅक्टर ; यशस्विनी चा पुढाकार
कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनी, इस्पा फाउंडेशन व जॉन डियर यांच्या संयुक्त विद्यमानाने बोरामणीत महिलांसाठी ट्रॅक्टरचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणार्थ्यांचे ऑनलाइन टॅब वरती परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी जॉन डियर व यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनीकडून प्रशिक्षण दिले. महिलाही कृषी क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात.
महिलांना सक्षम बनवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणित ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण सोबतच शेतीसाठी ट्रॅक्टर वापरण्याचे उपाय सांगत आहेत.
या प्रशिक्षण कार्यात बोरामणी व परिसरातील 45 महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांना प्रशिक्षण देताना महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्रशिक्षण मिळाल्यानंतर महिला स्वावलंबी होतील आणि ट्रॅक्टर चालवायला शिकल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये भरून आपली पिके बाजारात नेऊ शकतील त्यांना आत्ता कुटुंबातील पुरुषांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रियंका सुभानू, दिव्या रॉय, पुनम पटेल, सौरभ राऊत, सोपान भुलेकर, अनिता माळगे आदींनी परिश्रम घेतले.