आता रामराज्य येणार, मग 10 वर्ष रावणराज्य होते का? प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल
सोलापूर : भाजप महायुतीचे उमेदवार हे आता रामराज्य येणार म्हणून सांगत फिरत आहेत, पण मागील दहा वर्ष रावणराज्य होते का? आणि त्याचीच पावती ते देताना दिसत असल्याचं वक्तव्य काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. देशात लोकशाही टिकून राहायची असेल, संविधान वाचवायचे असेल तर काम करणाऱ्या सोबत रहा असे आवाहन ही प्रणिती शिंदे यांनी केले.
एका ठिकाणी शिक्षक सन्मान सोहळ्यात माजी आमदार दिलीप माने आणि उमेदवार प्रणिती शिंदे हे दोन्ही नेते अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसून आले. यावेळी माने हे पुन्हा काँग्रेस मध्ये आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.