सोलापूर : सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापुरात 164 कोटीच्या 42 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन व 8017 कोटी रुपयाच्या 250 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व खासदार, आमदार, सर्व शासकीय अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मात्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रोटोकॉल भंग केल्याचं निदर्शनास आलं. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे अधिकारी मागच्या रांगेत होते मात्र महापालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना पहिल्या रांगेत बसविण्यात आले होते तसे पाहायला गेले तर प्रशासकीय दृष्ट्या जिल्हाधिकारी या पदापेक्षा ही दोन्ही पदे मोठी नाहीत.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा कोणताही विषय असो प्रत्येक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होते. भूसंपादनाच्या विषयात तर जिल्हाधिकाऱ्यां शिवाय या विभागाचं पान सुद्धा हलत नाही. कुठे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासन लागते, काही ग्रामपंचायतचा विरोध असेल तर जिल्हा परिषदेची मदत घेता येते असे असताना या अधिकाऱ्यांना मागच्या रांगेत बसवून प्रोटोकॉलचा भंग करण्यात आला असे दिसून आले. खरेतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक सुहास चिटणीस हे जरी नवीन असली तरी त्या विभागात अनेक वर्षापासून कार्यरत असणारे सोलापूर महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनिल विपत यांना प्रोटोकॉल कळायला हवा होता.
‘विपत’ म्हणजे ‘NHAI’ने ‘विकत’ घेतल्या सारखे चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांचे पत्रिकेत नाव नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आले होते आणि जिल्ह्याचा प्रमुख आसणारा जिल्हाधिकारी मात्र मागच्या रांगेत याबाबत माध्यम प्रतिनिधी सोलापूर शहरातून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. स्वतः नितीन गडकरी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचं नाव उच्चारत ते आमच्या नागपूरचे आहेत असा विशेष उल्लेख केला होता. प्रोटोकॉल अभंग याची दखल निश्चित वरिष्ठ पातळीवरून घेतली जावी अशी मागणी आता जोर धरत आहे.



















