शरद पवारांनी मोहोळ मध्ये दिला खराखुरा उमेदवार ; भावांनो डुप्लिकेट पासून सावध रहा ; आता नाही तर कधीच नाही
सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून स्थानिक आणि ओरिजनल उमेदवार देण्याची मागणी जोर धरली होती. ओरिजनल म्हणजे स्थानिक आणि बौद्ध समाजाचा उमेदवार.
त्यासाठी अनेक इच्छुक होते परंतु भाजपने आमदार राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. राम सातपुते हे आक्रमक, अभ्यास होते पण वातावरण त्यांच्या बाजूने नव्हते आणि त्यांचा पराभव झाला. जर भाजपने स्थानिक आणि ओरिजनल उमेदवार दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते.
हे झाले लोकसभेचे आता सध्या विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सोलापूर मध्ये दोन मतदारसंघ हे राखीव आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मागील तीन टर्म एकही आमदार बौद्ध समाजाचा झाला नाही किंवा काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी या पक्षाने बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही.
यंदा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी खराखुरा आणि ओरिजनल उमेदवार आपल्या पक्षाकडून दिला आहे ते म्हणजे तुतारी या चिन्हावर उभे असलेले राजू खरे.
मोहोळ मध्ये आज पर्यंत तीन आमदार निवडून आले दोन मातंग समाजाचे होते आणि एक आहेत ते कैकाडी जातीचे. विद्यमान आमदार आणि उमेदवार यशवंत माने हे कैकाडी या अनुसूचित जातीमधील आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता.
आता राजू खरे यांच्यासाठी या मतदारसंघात मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले अभ्यासू वक्तृत्व शैलीचे नेते उमेश पाटील यासह शिवसेना नेते दीपक गायकवाड, सीमाताई पाटील, मानाजी बापू माने तसेच जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम विभागाचे माजी सभापती विजयराव डोंगरे ही मोठी नेतेमंडळी राजू खरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसत आहे.
असे असताना मोहोळ तसेच उत्तर तालुक्यातील 24 गावांमध्ये असलेल्या आंबेडकरी समाजाने आता प्रस्थापित नेत्यांची हुजरेगिरी बंद करून आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे अशी मागणी आणि चर्चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्ते करीत आहेत.
राजू खरे यांच्या रुपात खराखुरा आणि ओरिजनल आमदार सोलापूर जिल्ह्याला लाभेल. त्यामुळे डुप्लिकेट उमेदवारांपासून सावध राहावे “आता नाहीतर कधीच नाही” या असे आवाहन ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट करत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे.