शरद पवारांचा शनिवारी सोलापुरात मुक्काम ; हा आहे कार्यक्रम
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात मुक्कामी येणार आहेत. पवार यांचे शनिवारी पावणे तीन वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जातील, तिथे तीन ते पावणेसहा वाजेपर्यंत हॉटेल सरोवर मध्ये त्यांचा वेळ राखीव आहे.
सायंकाळी सहा वाजता विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरणसाठी जातील. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा बालाजी सरोवर या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहील. रविवारी सकाळी नऊ वाजता विमानतळाकडे जातील तिथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.