शिवछत्रपतींच्या महाआरतीने स्वराज्य सप्ताहाचा मोठ्या उत्साहात जल्लोषात शुभारंभ
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत असून राज्यभर शिवरायांचा विचाराचा वारसा प्रत्येकाने स्वतः अंगीकारून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठीच स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाने नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती रंगभवन चौक येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महिला आघाडीचे शहराध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोल ताशा– तुतारीच्या गजरात भगवे फेटे परिधान करून मोठ्या उत्साहात जल्लोषात अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींची महाआरती करण्यात आली.
शिव स्वराज्य ध्वज पताका सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या संचलनात जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते फडकवून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, अनिल उकरंडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानवंदना देवून मोठ्या जल्लोषात स्वराज्य सप्ताह शुभारंभ करण्यात आला.
सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्यास प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी भवन कार्यालयात प्रतिवर्षी प्रमाणे शिवमूर्तीस युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सव राजरा करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी तमाम शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ॲड .सलीम नदाफ फारूक मटके, भास्कर आडकी, राजू हुंडेकरी, साजिद पटेल, महेश कुलकर्णी, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, महेश वसगडेकर, अनिल छत्रबंद, अयुब शेख, इरफान शेख, बसवराज कोळी, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, दत्तात्रय बनसोडे, शामराव गांगर्डे, प्रदीप भालशंकर, अनिल बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, प्रकाश झाडबुके, अल्मेहराज अबादीराजे, अनिकेत व्हसुरे, संतोष वेळापूरकर, संतोष आलेगाव, सचिन रणखांबे, सचिन धुरी, रेणुका मंद्रुपकर, उमादेवी झाडबुके, ॲड. अमोल कोटीवाले, मल्लिनाथ इटकळे, मदन मुळे, सुरेखा घाडगे यांच्यासह सर्वच फ्रंटल चे प्रमुख पदाधिकारी – कार्यकर्ते , शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.