नरेंद्र मोदी सरकारला कामगार वर्ग घरी बसवेल ; सोलापुरात आडम मास्तरांचा दावा
सोलापूर – 16 फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक व क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंद मध्ये 25 कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवून संप यशस्वी केल्याबद्दल सर्व लढाऊ जनतेचे अभिनंदन केले आणि हा देशव्यापी औद्योगिक संप रोखण्यासाठी व चिरडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेचा गैरवापर केला तरीही आंदोलक धीरोदात्तपणे सरकार विरुद्ध आक्रमक झाले. सोलापूरात ही विडी, यंत्रमाग, असंघटीत, योजना कर्मचारी, रेडिमेड शिलाई कामगार आदींनी 100 टक्के बंद पाळले.
जनता आणि देश विरोधी धोरणे राबणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणे हा एक कलमी कार्यक्रम जनता हाती घेतली असून ते आता माघार नाही असा वज्र निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर सभेला संबोधित करताना केले.
शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना,संयुक्त किसान मोर्चा आणि सिटू च्या वतीने देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंद ची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापूरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव ॲड एम. एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटीत-असंघटीत , कामगार- कष्टकरी,शेतकरी व योजना कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्त नगर लाल बावटा कार्यालय पासून ते आंध्र दत्त चौक मार्गे पद्मशाली चौक, पोटफाडी चौक, शिवछत्रपती रांगभवन मार्गे पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला नंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख,
नलिनीताई कलबूर्गी, सुनंदा बल्ला, ॲड. अनिल वासम,शकुंतला पनिभाते आदींनी जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांना शिष्टमंडळ मार्फत निवेदन दिले.
सदर मोर्चा यशस्वी होण्यासाठी विल्यम ससाणे, विरेंद्र पद्मा ,वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, किशोर मेहता, नरेश दुगणे, दाउद शेख जावेद सगरी, दीपक निकंबे, ,अशोक बल्ला,अकील शेख,इलियास सिद्दीकी, दत्ता चव्हाण, आसिफ पठाण, बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,शहाबुद्दीन शेख ,अफसाना बेग, वसीम देशमुख, रफिक काझी, आप्पाशा चांगले, प्रभाकर गेंट्याल, राजेश काशीद,अमोल काशीद,हुसेन शेख, नितीन कोळेकर,बजरंग गायकवाड,सिद्राम गायकवाड,जुबेर शेख,धनराज गायकवाड,रहीम नदाफ,प्रशांत चौगुले,गंगाराम निंबाळकर,सुजित जाधव,युसुफ शेख कालू, नितिन गुंजे,रफिक नदाफ,इब्राहिम मुल्ला, अमिना शेख, अरबाज सगरी, अस्लम शेख हरीश पवार, फिरोज शेख, संदीप धोत्रे,मजीद नदाफ,अमीन शेख, अंबादास बिंगी, मल्लेशम कारमपुरी, पांडुरंग म्हेत्रे, प्रवीण आडम, बालाजी गुंडे,अंबादास गडगी,अनिल घोडके,बालाजी म्हेत्रे, संजय ओंकार, श्रीनिवास तंगडगी, राम मरेडी, विजय मरेडी, सिद्राम गडगी,शाम आडम आदींनी परिश्रम घेतले.
मागण्या:-
१. वाढती महागाई आटोक्यात आणा व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे दर कमी करा.
२. सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा व मागेल त्याला प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य द्या.
३. वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी नोकर भरती बंदी उठवा व बेरोजगारांना दरमहा ५००० रुपये रोजगार भत्ता लागू करा.
४. कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळविलेले ४४ कामगार कायद्यांचे ४ कामगार संहितेत रुपांतर करून प्रतीगामे बदल केले ते रद्द करावे.
५. २०१६ पासून विडी कामगारांसाठी अस्तित्वात असलेले कल्याणकारी मंडळ निष्क्रिय झाले असून कामगारांना मिळणारे लाभ बंद केले आहेत ते पूर्ववत सुरु करून सर्व लाभ वितरीत करावे.
६. विडी कामगारांना फरकासहित किमान वेतन रु.२१० व महागाई भत्ता रु. १४७.६१ असे एकूण रु. ३५७.६१ किमान वेतन लागू करा.
७. विडी कामगारांना कारखान्यातच रोख मजुरी द्या.
८. असंघटीत कामगारांना कोशियारी कमिटीच्या शिफारसीनुसार ७५०० रुपये पेन्शन व २५०० रुपये महागाई भत्ता असे एकूण १०००० रुपये द्या.
९. यंत्रमाग कामगारांना माथाडी कायद्याच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून सर्व कामगार कायद्यांचे लाभ मिळवून द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा.
१०. यंत्रमाग कामगारांना फरकासहित किमान वेतन व महागाई भत्ता दरमहा १५७९७/- रुपये मिळावे, ओळखपत्र, हजेरी कार्ड, पगार पत्रक कारखानदारामार्फत मिळावे व यंत्रमाग कामगारांची सहा.कामगार आयुक्त कार्यलयात नोंदणी करावी.
११. जगातील ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी, पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर च्या लाभार्थ्यांना वाढीव २ लाख १० हजार अनुदान द्या.
१२. रे नगरच्या लाभार्थ्यांना नाममात्र व परवडणाऱ्या दरात सौरऊर्जा बसवा.
१३. रे नगरची अकृषिक आकारणी शुल्क रद्द करा.
१४. रे नगर फेडरेशन च्या कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृह. संस्था, कॉ. एम. के.पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृह.संस्था तसेच कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सह.गृह.संस्था यांना ६७ एकर जागेवरील वरील अटी-शर्ती शिथिल करा.
१५. रे नगर फेडरेशनच्या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना लावण्यात आलेल्या १ टक्का लेबर सेस रद्द करा.
१६. आशिया खंडातील सर्वात मोठे एकमेव महिला विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील सांडपाणी, मलनिस्सारण सर्वेक्षण झाले असून यासाठी ७५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. तो निधी तात्काळ द्या.
१७. २००६ साली केलेल्या रस्त्यांचे अद्यापही पुनःडांबरीकरण झालेले नसून कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील १६ कि.मी. अंतर्गत रस्त्यांसाठी ९ कोटी ७५ लाख निधीची आवश्यकता आहे. सदर निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावे.
१८. कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांना रे नगरच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क नाममात्र दर १००० रुपये लागू करा.
१९. महाराष्ट्रातील हातमाग कामगारांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये हातमाग कामगार विणल्या जाणाऱ्या सिल्क साडीचा समावेश करून फेर शासन निर्णय जाहीर करून सर्व हातमाग कामगारांना उत्सव भत्ता द्या.
२०. रेडीमेड-शिलाई कामगारांना कामगार कायदे लागू करून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा मिळवून द्या.
२१. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध कायदा मजबूत करा.