महानगरपालिका नगरपालिकांचा बार दिवाळीत वाजणार ? प्रभाग रचनेच्या तारखा जाहीर
सोलापूर : दोन दिवसांपूर्वी साडे तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिका व नगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिल्या. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
संपूर्ण GR वाचण्यासाठी येथे क्लिक करा
12 जून रोजी पुन्हा नगर विकास विभागाने पत्र काढून प्रभाग रचनेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अकरा जून पासून प्रक्रिया सुरू होऊन एक सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावरून दिवाळी नंतर महापालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा बार उडणार असे स्पष्ट होत आहे.