खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ; दादांच्या वाढदिनी किसन भाऊंचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व माजी नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा आयोजन दिनांक २१ ते २५ जुलै दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन २१ जुलै रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून स्थळ नवयुग जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगण रामवाडी शासकीय गोदाम जवळ दुपारी दोन वाजता होणार आहे. वजन व कागदपत्र छाननी हे २१ जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तरी सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. वजनसाठी २१ जुलै तारखेला ०९ जुलै रोजी सकाळी ०९ वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे.
वजन हे फक्त त्याच दिवशी घेण्यात येईल त्या दिवशी वजनाला गैरहजर असणाऱ्या संघाला त्या स्पर्धेमध्ये विचार केला जाणार नाही याची आपण कृपया नोंद घ्या या स्पर्धेकरिता प्रवेश फी संघाची संलग्नता फी पाचशे रुपये व संघाचे प्रवेश फी २६० अशा प्रमाणे असणार आहे
पुरुष गटासाठी वजन ८५ किलो व महिलासाठी ७५ किलो
किशोर मुले वजन ५५ किलो व किशोरी मुली वजन ५५ किलो किशोर गटासाठी जन्मतारीख
१/१/२०१० वर्षाच्या नंतर असावे ज्या संघांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. अशा संघाने खालील क्रमांक वर संपर्क साधावे
संतोष जाधव 98 50 43 03 43
मदन गायकवाड 7972007986
प्रकाश जाधव 8805242433
चेतन गायकवाड 7758070450