Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 December 2025
in political
0
खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ
0
SHARES
314
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

सोलापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते इकडून तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. अनेकांचा ओढा हा सत्तेत असलेल्या पक्षांकडे आहे. सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपकी बार 75 पार असा नारा दिला आहे. त्यातच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूर मध्ये लक्ष घातल्याने वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आकर्षित झाले आहेत.

त्यातच आता खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोहेल कुरेशी यांचाही सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. सोहेल लवकरच हाती घड्याळ बांधणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आगामी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता काँग्रेसचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख हे सुद्धा राष्ट्रवादीत आले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. प्रभाग चौदा मध्ये मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात आणि निर्णायक मते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी प्रभाग चौदा यंदा ताब्यात घेण्यासाठी सरसावली आहे.

सोहेल कुरेशी हे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापुरात परिचित आहेत. विजापूर वेस भागात सोहेल यांना मानणारा वर्ग आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोहेल यांनी पण निर्णय पक्का केल्याचे समजते.

नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या झालेल्या सोलापूर दौऱ्या दरम्यान सोहेल कुरेशी हे राष्ट्रवादीकडे आकर्षित झाल्याची माहिती समोर आली आहे. आता सोहेल हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. सोहेल कुरेशी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास महापालिका निवडणुकीपूर्वी हा काँग्रेसला मोठा धक्का असेल हे नक्की.

Tags: @PranitiShindeAjit PawarAjit Pawar NCPAnna bansode
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

Next Post

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973468
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group