खा. प्रणिती शिंदे यांनी स्पष्टच सांगितले ; काँग्रेसकडून सोलापूर ‘शहर मध्य’ची उमेदवारी….
सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शिखर पहारिया हे गणेशोत्सव दरम्यान सोलापुरात येऊन गेले. त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर शहर मध्य या मतदारसंघातून त्यांना प्रेझेंट करण्यात येत असल्याच्या बातम्या लागल्या. शहर मध्यचा काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून ही त्यांची चर्चा सुरू झाली.
यानंतर निश्चितच काँग्रेस पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर ऐकण्यास मिळाला.
एकूणच मध्य बाबत सुरू झालेली चर्चा आणि येत असलेल्या बातम्या यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपडला यांच्यामार्फत स्पष्टीकरण दिले आहे.
सोलापुरातून काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल, शिखर पहारीया गणपती दर्शनासाठी आले होते त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पाहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे. काही जण आणि काही मीडिया द्वारे अनेक समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. शिखर पहारिया हे आपले आजोबा सुशीलकुमार शिंदे यांच्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शनासाठी सोलापूरला आले होते, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखर ते काही मंडळांना भेट दिली होती. मंडळांना भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठेही म्हंटले नाही. ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनांच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून दिले आहे.
तिरुपती परकीपंडला
प्रमुख: सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सोशल मीडिया, प्रसिद्धी विभाग
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬