सोलापूरच्या मुस्लीम भावांनो, राज्यात सरकार बनतेय सोबत राहा ! मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय
मी महाराष्ट्रातला खासदार आहे, मी मुस्लिम नाही का? नांदेड मधून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना संधी दिली , मी मुस्लिम समाजाचेच दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतो ना , त्यामुळे छोट्या नाराजी दूर ठेवा, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे, मदत करा, आज सोलापुरात शांती व समाधान राहते? सोलापुरात सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यामुळेच सर्वधर्मसमभाव टिकून आहे, हे लक्षात घ्या त्यामुळे सोबत रहा, असे आवाहन राज्यसभेचे काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केले.
एका आमदाराची ही निवडणूक नाही राज्यातील महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आणि महायुतीला उखडून फेकणारी ही निवडणूक आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करतोय मी कोणत्या मीडियाच्या सर्वे वर अवलंबून राहत नाही ग्राउंड सर्वे पाहतो त्यामुळे मला माहित आहे की नक्की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बसेल.
ते म्हणाले, हे महाराष्ट्र आहे याला दिल्लीचे किंवा गुजरातचे रिमोट चालवू शकत नाही. भाजप महायुतीला आता जनता कंटाळलेले आहे. महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
“बटेंगे तो कटेंगे” याशिवाय भाजप काय बोलणार त्यांच्याकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाहीत परंतु आम्ही महाविकास आघाडी “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलेंगे ” हा नारा देत चाललो आहे.