महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी शहरात झंझावात ; महादेव कोगनुरे यांनी केले हे आवाहन
सोलापूर ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद आहे. ग्रामीण भागासह शहरातही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने उद्या (ता. १३) शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्य संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
सोलापूर शहरात उद्या सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा देवी मंदिर, भावताऋषी नगर, ज्योती नगर, जाधव पिठाची गिरणी, शरणबसवेश्वर नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी बोळ, गंगा चौक, नवदुर्गा मंदिर, नीलम नगर, गणेश मंदिर, करली चौक, थोबडे बस स्टॉप, महांतेश्वर मंदिर, मार्कंडेय चौक, शिवशरण मठ, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती, तक्का वस्ती, विजयनगर आदी भागात पदयात्रा निघेल.सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत ताई चौक, दीक्षित नगर, मल्लिकार्जुन नगर, स्वागत नगर, केंगनाळकर शाळा, हुच्चेश्वर मठ, पारसी मैदान, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा चौक, विष्णूनगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर, शशीकला नगर, ललिता गट, शांतिनगर झोपडपट्टी १ व २, देसाईनगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसवरोड मठ या भागात पदयात्रा होईल.
मनसे उत्तम पर्याय
विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता वैतागली आहे. केवळ आश्वासने देऊन अंमलबजावणीचे तीन तेरा वाजले आहेत. सर्वच क्षेत्रातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्तम पर्याय असल्याची प्रतिक्रिया दक्षिण सोलापूरचे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली.