विजयकुमार देशमुख यांची आली प्रतिक्रिया ; यासाठी सुभाष देशमुखांच्या सोबत राहणार
सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी जेष्ठ आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभे करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
यावर माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, या निवडणुकीत मी भाग घेणार नाही हे यापूर्वी सांगितले आहे परंतु सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभा करणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असे सांगताना जिल्हाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार दिले आहेत हे आम्हाला माहीत नाही तसे कोणी सांगितले ही नाही असे म्हणत नकळत नाराजी व्यक्त केली.