सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बै ठक गुरुवारी घेण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.
एकूणच हा आराखडा पाहता मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी काही महत्त्वाच्या बाबींसाठी निधी वाढवण्याची मागणी केली. त्यामध्ये जन सुविधा योजना, जिल्ह्यातील रस्ते तसेच महावितरणला निधी वाढविण्याकडे लक्ष वेधले. पर्यटनाला तरतूद केलेला निधी कमी करून तो या महत्त्वाच्या विषयाकडे वळवण्याची मागणी केली. यावेळी शेजारी बसलेले आमदार संजय शिंदे यांनी ही आवताडे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तशा सूचना केल्या.