सचिन कल्याणशेट्टी यांना सुभाष देशमुख यांच्या वाढदिनी शुभेच्छा ; दादांनीही दिला बापूंना रिप्लाय
सोलापूर : भारतीय जनता पार्टी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मतदारसंघात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी दादांच्या वाढदिवसाचे मोठे मोठे बॅनर लावत पेपर मध्ये जाहिराती दिल्या आहेत. त्यामुळे यंदाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केल्याचे दिसून येते.
बाजार समितीच्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी ही गुरु शिष्याची जोडी तुटली. काही गोष्टींमुळे दुरावा निर्माण झाला. एकमेकांविरोधात राजकीय कुरघोड्या सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत असे असताना आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“माझे सहकारी, भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला सुख-समाधानाचं आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा” !
सुभाष देशमुख यांच्या पोस्टवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रिप्लाय दिला आहे. त्यामध्ये “मा. सुभाषबापू देशमुख जी, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद ! आपले प्रेम आणि सहकार्य असेच कायम राहूदे, हीच प्रार्थना” !






















