सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे मित्र परिवाराच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच ग्रामीण भागात विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये जुळे सोलापूर भागात तब्बल 51 हजार रुपयांचे पहिले बक्षीस असलेल्या ताई चषक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले तसेच सध्या रामवाडी भागामध्ये सुरेश हसापुरे यांच्या पुढाकाराने युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी ताई चषक प्री कबड्डी स्पर्धा सुरू असून त्याला ग्लॅमर रूप आले आहे.
याच दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी ही नागपूर हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर लक्ष वेधले. अधिवेशन संपल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या शुक्रवारी सोलापुरात आल्या.
सुरेश हसापुरे मित्र परिवाराच्या वतीने जनवात्सल्य निवासस्थानी सायंकाळी आमदार प्रणिती ताई यांचा चांदीची गणेशमूर्ती देऊन हसापुरे यांनी सत्कार केला. भावी खासदारकीच्या यावेळी श्री गणेशाच्या साक्षीने शुभेच्छा देण्यात आल्या. हसापुरे यांच्या सत्काराने आमदार ताई सुद्धा भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील, सुभाष पाटोळे, मोतीलाल राठोड, बनसिद्ध बन्ने, संतोष पवार, पद्मसिंह शिवशेट्टी, जयशंकर पाटील, मोबीन शेख, काशीनाथ कुंभार सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.