देवेंद्र दादांच्या ड्रीम कार मधून पालकमंत्र्यांची सफर ; जयभाऊंशी जमली जोरदार गट्टी
सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे यांनी दोन दिवसांपूर्वीच फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला. कोठे यांचे संपूर्ण कुटुंबीय त्या व्हिडिओमध्ये दिसत होते तो व्हिडिओ होता. देवेंद्र कोठे यांच्या ड्रीम कारचा.
स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आमदार देवेंद्र दादांनी मर्सिडीज बेंज ही कार घेतली. या कारचे स्वागत संपूर्ण कुटुंबीयांनी केले. त्याकारच्या व्हिडिओ वर देवेंद्र कोठे यांनी एक भावनिक पोस्ट टाकली. ती म्हणजे इच्छापूर्ती तात्या साहेबांची. गाडीनंतर घेऊ… आमदार झाल्यानंतर…
या मर्सिडीज कारची सध्या सोलापुरात जोरदार चर्चा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. जयाभाऊ हे शासकीय विश्रामगृहावर होते त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष करून आपली मर्सिडीज बेंज रेस्ट हाऊस वर उभी केली होती. जयभाऊ यांना पण ती कार पाहून त्यामध्ये बसण्याचा मोह आवरला नाही.
भाऊ बसले पण स्टेरिंगवर स्वतः देवेंद्र दादा होते. हा क्षण कोठे कुटुंबियांसाठी आनंदाचा दिसून आला. पालकमंत्री हे गाडीमध्ये बसल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला त्यानंतर हे सर्वजण श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिराकडे रवाना झाले. परवाच श्री मार्कंडेय रथोत्सव मिरवणुकी दरम्यान देवेंद्र दादांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे पावसात भिजत या रथोत्सव यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले.