मराठा आंदोलक आ. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थासमोर गेल्यानंतर काय घडले…
सोलापूर : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील सात दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही.
20 फेब्रुवारी रोजीच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वच आमदारांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी मराठा समाज बांधवांनी आंदोलन करून लक्ष वेधले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानासमोर मराठा आंदोलकांनी या मांडून घोषणाबाजी केली.
सुभाष देशमुख दिल्लीला जात असल्याने त्यांचे स्वीय सहाय्यक शेखर येरणाळे यांनी फोन लावून दिला. देशमुख यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी समाजाच्या कायमच पाठीशी आहे, येणाऱ्या विशेष अधिवेशनात चर्चा होऊन आरक्षणाचे विधेयक पारित करण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.