‘मेनका राठोड’ विधानसभा लढविण्याच्या तयारीत ; दक्षिण मध्ये पुन्हा बापूंचे वाढणार टेन्शन
सोलापूर : बंजारा समाजातील माजी नगरसेविका मेनका राठोड या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या चिंतेत निश्चितच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे सुमारे 40 च्या वर तांडे आहेत. सुमारे 50 हजार मतदार संख्या आहे. हा समाज सुद्धा आजपर्यंत बऱ्यापैकी काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळाले पण मागच्या काही निवडणुका पाहता या समाजाची मते काँग्रेस आणि भाजपमध्ये वाटली गेल्याचे आकडेवारी सांगते.
दरम्यान आता बंजारा समाजातील डॅशिंग महीला कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी दक्षिणमधून रणसिंगा फुंकले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही माहिती समोर आली असून आपल्या बंजारा बांधवांकडे आमदारकीची ओवाळणी मागितली आहे. राठोड यांचे पती शिवराज राठोड हे याच विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष महसूल विभागात काम करीत असल्याने त्यांची स्वतःची गावोगावी ओळख आहे, ते सर्व राजकीय हालचाली आणि घडामोडी जाणून असतात, त्याचा ही फायदा मेनका ताई यांना होऊ शकतो हे नक्की आहे. त्यामुळे एकूणच समाजाचा उमेदवार म्हणून पुढे आला तर निश्चितच या समाजाला सोलापूर जिल्ह्यातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची संधी मिळेल अशी चर्चा आहे.
कोण आहेत मेनका राठोड?
सोलापूर महानगर पालिका नगरसेविका, सभापती,आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना अनेक कामे केलेली आहेत त्यामुळे नागरिकांकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असे आग्रह होत आहे. मेनका राठोड यांनी अनेक पदे भूषवली आहेत.
नगरसेविका,सभापती,जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण समिती सदस्य, विधी समिती सदस्य, त्यांनी महानगर पालिका व जिल्हा नियोजन समिती कडून अनेक कोट्यवधीचे काम त्यांच्या प्रभागात केलेले आहेत. रस्ते, ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन, इलेक्ट्रिक पोल व लाईट अनेक प्रकारची निधी आणून प्रभागात समतोल विकास करण्याचे प्रयत्न केलेले आहे. कोविड काळात अनेक गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तू पुरवलेली आहेत. अनेक आरोग्य शिबीर घेतलेली आहेत.
कोरोना काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करीत असताना त्यांना दोन वेळा कोरोना देखील झाला होता. त्यांनी त्यांच्या समर्थ प्रतिष्ठान व S R ग्रुप मार्फत रक्तदान शिबीर, वृक्षरोपण, गरिबांना अन्न वाटप, आरोग्य शिबीर, शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत.कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांना कोविड महायोद्धा पुरस्कार मिळालेले आहे.