उत्तरसाठी महेश कोठे ‘वन मॅन शो’, अक्कलकोट कोणीच नाही ; ‘मोहोळ -माळशिरस’मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी ; एनसीपीकडून कुणी कुणी मागितले तिकीट
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये अक्कलकोट मधून एकानेही मुलाखत दिली नाही. शहर उत्तरसाठी महेश कोठे हे वन मॅन शो पाहायला मिळाले आहेत तर मोहोळ आणि माळशिरस या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांमधून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असलेल्या अनेकांनी आता आपली गाडी तुतारीकडे वळवल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते.
मंगळवारी झालेल्या मुलाखतींमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धर्मराज काडादी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे आणि मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मुलाखती दिल्या आहेत. शहर मध्य या मतदारसंघातून कार्याध्यक्ष तौफिक शेख, यू एन बेरीया, प्रमोद गायकवाड, वंदना भिसे यांनी मुलाखती दिल्या आहेत.
शहर उत्तर मधून एकमेव महेश कोठे यांनीच मुलाखत दिल्याचे सांगण्यात आले.
करमाळा : नारायण पाटील, संतोष वारे, रामदास झोळ
पंढरपूर : नागेश फाटे, संजय कुमार भोसले, वसंतराव देशमुख, भगीरथ भालके, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, राहुल शहा, अनिल सावंत, साधना भोसले, सुभाष भोसले, नागेश भोसले
मोहोळ : रमेश कदम, अभिजीत ढोबळे, सुशीला आबुटे, कोमल साळुंखे, नारायण शिंदे, पृथ्वीराज शेरखाने, श्रीधर कणसेकर, किशोर कुमार सरदेसाई, पवन कुमार गायकवाड, शहाजी राऊत, संजू बगाडे, हनुमंत सोनवणे, संजय शिरसागर, राजू खरे, लक्ष्मण सरवदे, अमोल बंगाळे
माळशिरस : कोमल साळुंखे, राजू साळवे, त्रिभुवन धाइंजे, राजेश गुजर, चंद्रशेखर खडतरे
माढा : मीनल साठे, भारत पाटील, शिवाजी कांबळे, धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे, अनिल सावंत, सुरेश पाटील, संजय कोकाटे, अभिजीत पाटील
बार्शी : विश्वास बारबोले, साहेबराव देशमुख
सांगोला : जयमाला गायकवाड, बाबुराव गायकवाड