महेश कोठे असे का म्हणाले ; …अन्यथा राजकारण सोडून देईन
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख हे पन्नास हजाराच्या फरकाने विजयी झाले.
या पराभवानंतर कोठे हे प्रथमच मीडिया समोर आले. त्यांनी भाजपला टार्गेट करताना पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. VVPAt मशीन पण ते मोजायला तयार नाहीत. त्यामुळें हे संशयास्पद आहे.
मी या मतदारसंघातील इतर भागाचा निकाल मान्य करेन पण मी घरकुल भागात मोठा विकास केला, ड्रेनेज, पाणी याची कायमस्वरूपी सोय केली. अनेकांना नोकऱ्या दिल्या, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. ही माणसे माझी आहेत. या निवडणुकीत ते मला कसे नाकारतील? विडी घरकुल भागात मला एकही बुथवर लीड नाही, हे न पटण्यासारखे आहे. तिथल्या लोकांनी मला का नाकारले हे सिद्ध झाले पाहिजे, तिथल्या VVPAT मशीनचे मतदान मोजले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी राम मंदिराला मतदान करणार पण विधानसभा निवडणुकीत मतदान तुम्हाला राहील असा शब्द तिथल्या जनतेने मला दिला होता. त्या भागाने जर मला नाकारले असेल तर मी राजकारण सोडेन, मला राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही.
सुरेश पाटील यांनी आपल्या भागात पोट तिडकीने जनतेला सांगितले, बिज्जु प्रधाने यांनी प्रचंड मेहनत घेतली तिथं मते मिळत माहित यावर विश्वास बसत नाही. आंबेडकरी, मराठा आणि मुस्लिम समाजाची मते गेली कुठे असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.