सोलापूर:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे रहाणारे सिध्दाप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. त्यात सुदैवानं जिवितहानी झाली नसली, तरी भरपूर नुकसान झाले. एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहित मिळताच ङोक्यावरचं छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबाची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत केली.
खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा ह्या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकविण्याचे काम केले आहे.
याप्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण, विश्वनाथ कुमठेकर, सागर सिमेंट विक्रेते रमेश कट्टीमनी, कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते, तेरा मैल पोलिस पाटील प्रवीण राठोड, ग्रा सदस्य सोमनाथ जोकरे, ग्रा. सदस्य तुकाराम मद्रे, ग्रा सदस्य चांदबाशा सय्यद, सामाजिक कार्यकर्ता हुवन्ना शेजाळ, अनिकेत पाटील, मशाप्पा कोळी, प्रशांत कुमठेकर, डॉ महादेव जोकारे, सुरेश तेलगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.