Thursday, November 13, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा – संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 July 2025
in political
0
किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा – संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम
0
SHARES
472
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा – संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम

 

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने २१ ते २५ जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये ७०हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला तर ९०० पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता.

 

किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लिमयेवाडी येथील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले. या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मोनिका देवेंद्र कोठे, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक तौफिक शेख, गुरुशांत दुत्तरगावकर, गामा पैलवान, सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार, हाजी मलंग शेठ, अप्पा रोडगे, माजी नगरसेवक पैगंबर शेख, आनंद मुस्तारे, एडवोकेट सुशील सरवदे, माजी नगरसेविका संगीता जाधव, इरफान शेख, करेप्पा जंगम,नारायण माशाळकर, किरण माशाळकर, सुहास कदम, वैभव गंगणे, अमीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे खेळाडूंचे ओळख होऊन नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आले.

 

या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमक चढाया अन कौशल्याने होणाऱ्या पकडी चपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत करत पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेते पद श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबने पटकावले, महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोर गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकाविला आणि किशोरी मुलींच्या गटात रुकमाई स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलने कबड्डीच्या विजेते पदाच्या चषकावर नाव कोरले.

 

सदर स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघांना अजितदादा चषक हे आमदार कोठे आणि सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव, लक्ष्मण मामा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भला मोठा हार घालून केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी बोलताना किसन जाधव म्हणाले, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे या मागचा उद्देश आहे आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानिमित्त मी आपले मनस्वी आभार मानतो. किसन जाधव हे पक्ष संघटन बरोबरच जनसेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे किसन जाधव हा सोन्यासारखा माणूस असून अजित दादांचा सच्चा शिलेदार असल्याचे मनोगत यावेळी प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले.

 

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, किसन जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांचे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आहे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी पाठपुरावा करीत असतात त्यांचे सहकारी नागेश गायकवाड यांच्या कार्याचे देखील कौतुक केले. यावेळी संतोष पवार आणि उमेश पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात किसन जाधव यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक तथा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माजी आमदार संजय शिंदे यांनी देखील भ्रमणध्वनीद्वारे किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव, कार्यवाहक मदन गायकवाड, प्रकाश जाधव, एल एस जाधव, निरीक्षक गिरीश जाधव, स्वाती पुंजाल, संतोष जाधव रफिक गारे, चंद्रकांत ब्रदर जाधव, राजू दादा जाधव, बबलू भैय्या यादव कटिंग ,समीर विजापुरे, बजरंग गायकवाड, गणेश जाधव, तेजस पैकीकर, मिथुन वडजे, कृष्णा गायकवाड, मेघा गवळी पूजा जाधव गायत्री वायदंडे, रसिका गायकवाड, प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, प्राध्यापक भक्तराज जाधव, संजय शिंदे, अनिकेत माने, इस्माईल ढवळगी,मरगु जाधव, तन्मय गायकवाड, धनराज जाधव आदींचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी मानले.

Tags: Ajit Pawar NCPKisan jadhavMLA Devendra kotheSantosh pawarUmesh Patil
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची 'सिंहासन'ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

ताज्या बातम्या

मनोज शेजवाळ -गणेश वानकर आमने सामने? दोन्ही शिवसेना भिडणार

मनोज शेजवाळ -गणेश वानकर आमने सामने? दोन्ही शिवसेना भिडणार

13 November 2025
भाजप प्रवेशानंतर कोठेंनी प्रथमच घेतला फडणवीसांचा आशीर्वाद

भाजप प्रवेशानंतर कोठेंनी प्रथमच घेतला फडणवीसांचा आशीर्वाद

13 November 2025
काय हे प्रथमेश ! अण्णांचा एकही विश्वासू कार्यकर्ता दिसत नाही ; ज्येष्ठ निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी

काय हे प्रथमेश ! अण्णांचा एकही विश्वासू कार्यकर्ता दिसत नाही ; ज्येष्ठ निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी

12 November 2025
सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर ; राजेश काळे, मनोज शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांची अडचण

सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर ; राजेश काळे, मनोज शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांची अडचण

11 November 2025
सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन ; थेट भाजपला दिले हे चॅलेंज

सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन ; थेट भाजपला दिले हे चॅलेंज

11 November 2025
सोलापूरच्या पैलवानाने मशाल सोडून हाती बांधले घड्याळ

सोलापूरच्या पैलवानाने मशाल सोडून हाती बांधले घड्याळ

10 November 2025
सोलापुरात शरद पवारांना दुसरे कोणी भेटत नाही का? पुन्हा महेश गादेकरच

सोलापुरात शरद पवारांना दुसरे कोणी भेटत नाही का? पुन्हा महेश गादेकरच

9 November 2025
किसन जाधव यांच्या प्रभागात आज अल्पसंख्यांक सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

किसन जाधव यांच्या प्रभागात आज अल्पसंख्यांक सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

9 November 2025

क्राईम

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार

by प्रशांत कटारे
18 October 2025
0

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी...

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

by प्रशांत कटारे
14 October 2025
0

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेप...

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले

by प्रशांत कटारे
9 October 2025
0

सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले तलाठ्याने घेतलेली नोंद फेटाळली असल्याचे सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Our Visitor

1913567
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group