कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार
सोलापूर दि. उत्कृष्ट सेवाकर्मी उपक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यामध्ये प्रथम कमांक पटकावल्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याबद्दल कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी संघटनेचे सरचिटणिस धन्यकुमार राठोड, कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरु, नरसिह गायकवाड, नागनाथ धोत्रे, मकरंद बनसोडे, रामदास गुरव, भगवान चव्हाण, संतोष जाधव, योगेश कटकधोंड, देविदास म्हेत्रे, आदि सह संघटना पदाधिकारी उपस्थित होते.



















