काका साठे -उमेश पाटील आले जिल्हा परिषदेत समोरा समोर ; पुढे काय घडले
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार हे बाहेर पडल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा एकमेकांचे विरोधक झाले. सोलापूरात जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पवार हे होते. आता हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आहेत.
काही दिवसांपूर्वी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी वयाच्या कारणानिमित्त शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला या विषयावर पत्रकारांनी उमेश पाटील यांना छेडले असता त्यांनी जर भारत जाधव यांना वयाची अट लागू शकते तर काका साठे यांना का नाही असे म्हणून नव्यांना संधी दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांच्याकडे गेला. याचवेळी काही पत्रकारांनी जिल्हा परिषदेमध्ये काका साठे यांना उमेश पाटलांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली तेव्हा पक्षाने चिन्ह गेल्याचा सगळाच राग काका साठे यांनी उमेश पाटलांवर काढल्याचे पाहायला मिळालं.
बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या जिल्हा परिषदेमध्ये नसल्याने त्यांना भेटायला आलेले राजकीय नेते आणि जिल्ह्यातून आलेले नागरिक हे सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना भेटत होते. त्यामुळे उमेश पाटील हे सुद्धा कोहिनकर यांच्या चेंबरमध्ये येऊन बसले.
हे पण वाचा : आता त्या शाळांवर फौजदारी कारवाई करणार
याचवेळी काका साठे हे चेंबर मध्ये आले त्यांनी उमेश पाटील यांना पाहताच कोहिनकर यांना आपले काम सांगून लगेच निघून जात होते परंतु ते उमेश पाटील यांनी पाहिले उठून काकांना आदरपूर्वक नमस्कार घातला. उमेश पाटलांनी दिलेला आदर पाहून काकांनी त्यांना तितक्यात सन्मानाने नमस्कार केला. लगेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी हे फोटो घेतले. तेव्हा उमेश पाटील यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना काका साठे हे ज्येष्ठ आहेत त्यांना आमच्यावर रागावण्याचा अधिकार आहे, मुळात आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत असे म्हणून विषयावर पडदा पाडला.