जितेंद्र साठे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ; २११ रक्तदात्यांनी केले रक्तदान
उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व रक्तदान शिबीर घेण्यात आले. २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवसभर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साठे यांना शुभेच्छा दिला.
वडाळा येथील माऊली महाविद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच जितेंद्र साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.शिरीष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट मेंबर डॅा.वैशालीताई साठे, संस्थेचे संचालक जयदीप साठे, हरिभाऊ घाडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे, माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, वसतिगृह अधीक्षक अजित परबत, माऊली कॅालेज आफ एज्युकेशनचे प्राचार्य डॅा.नागेश सर्वदे, प्रवीण साठे, प्रवीण सुतार, प्रा.पी.आर.पाटील, राजेंद्र साठे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॅा.दत्तात्रय हरवाळकर, प्रा.डॅा. विकास शिंदे, क्रीडा संचालक बाळासाहेब वाघचवरे, माऊली इंग्लिश मेडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत शिंदे, जयभारत विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक सुशील गाडे यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, भाजपाचे नेते इंद्रजीत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, शरद माने, दिनेश साठे, हरिकृपा उद्योग समुहाचे विश्वास साठे, कुलदैवत निधीचे चेअरमन दत्तात्रय वीर, गावडीदारफळचे सरपंच भारत माळी, जितेंद्र शिलवंत, नागेश पवार, उपसरपंच कल्याण काळे, अनिल माळी,रमेश सुतार, दिपक अंधारे, भाऊ लामकाने, मंजूर शेख, दाजी गोफणे, शिरीष म्हमाणे, प्रवीण भालशंकर, बापूराव भोसले, बाळराजे मोहिते, संतोष सुभेदार आदींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक, मेडिकेअर ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले.