भारतीय डाक विभागाचे आता IPPB मर्चंट अकाउंट ; पेटीएम, फोन आणि गुगल पे ला देणार टफ
सोलापूर : केंद्र सरकारच्या महत्वाच्या वित्तीय समावेशन योजनेअंतर्गत भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या वतीने व्यवसायीक ग्राहकांसाठी IPPB मर्चंट अकाउंट सुरु करण्यात आले आहे.
सोलापुरात पुणे क्षेत्रिय विभागाचे पोस्टमास्तर जनरल जायभाये यांच्या MIDC सोलापूर पोस्ट ऑफिस आणि अक्कलकोट पोस्ट ऑफिसच्या भेटी दरम्यान, MIDC पोस्ट ऑफिसच्या आवारातील शाकंभरी होजीअरीचे मालक गौर यांचे आणि अक्कलकोट येथील बसवराज घोळसे याचे पोस्टमन मार्फत IPPB मर्चंट अकाउंट उघडून देण्यात आले.
पोस्टमास्तर जनरल आर के जायभाये याच्या हस्ते त्या दुकानदारांना लगेच IPPB मर्चंटचे QR कोड देण्यात आले. लगेच दिलेल्या त्या QR द्वारे व्यवहार ही करण्यात आले.
पोस्टाची IPPB मर्चंट अकाउंट ची ही सेवा दुकानदारांना खूप आवडली असून त्याबद्दल आंनद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पुणे क्षेत्रीय विभागाचे पोस्ट सहाय्यक अधिक्षक दत्ता खेडेकर, सोलापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक आर डी कुलकर्णी सर, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय) सोमनाथ काळे, उत्तर सोलापूरचे सहाय्यक अधीक्षक प्रफुल बंगाळे, अक्कलकोट पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर बनसोडे, MIDC सोलापूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर कुलकर्णी उपस्थित होते.
IPPB मर्चंट अकाउंट चे फायदे कोणतेही लहान मोठे दुकानदार घेऊ शकतात. सदर फायदे खालील प्रमाणे आहेत.
1.IPPB मर्चंट चे डाक मोफत डाक QR आपल्या दुकानात लाऊन त्या मार्फत सुरक्षित व सुलभ पद्धतीने व्यवहार करू शकतात.
2.सदर QR मार्फत जमा होणारी रक्कम IPPB खात्यात त्वरित जमा होते. सदर खाते उघडून QR देताना कोणताही शुल्क आकारला जात नाही.
3.QR मार्फत पैसे जमा झाल्यावर मर्चंट ॲप्लिकेशन मार्फत ऑडिओ प्रणाली ने खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज ऐकू येतो. या मधे वेगळे sound box घेण्याची आवशकता नाही.
4. सदर डाक पे QR ,IPPB खाते आधार SEEDING केलेल्या खात्यास सल्लग्न केल्यास प्रधान मंत्री स्वानिधी योजने मध्ये पात्र ठरते.
5. मर्चंट QR मार्फत व्यवहार झाल्याने सदर ग्राहक भविष्यात IPPB सोबत सलग्न असलेल्या विविध आर्थिक संस्था कडून कर्ज उपलब्ध करून घेनेस पात्र होऊ शकतो.
6. मर्चंट QR धारक आपल्या खात्यातून पोस्टाच्या RD, PLI/RPLI, सुकन्या समृध्दी, पोस्ट ऑफिस सेविंग्ज खात्यात त्वरित पैसे भरू शकतो.
7.2 लाख रकमे पुढील रक्कम IPPB खात्यातून POSB खात्यात जमा करून सदर रकमे वर पोस्ट बचत खात्याचे 4टक्के व्याज मिळवता येते. ( यासाठी IPPB खाते व पोस्ट ऑफिस चे बचत खाते लिंक असणे गरजेचे आहे)
8. IPPB तसेच पोस्ट ऑफिस चे कोणतेही लोकपयोगी उत्पादने पोस्ट ऑफिस तसेच पोस्टमन यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेता येतील.