दक्षिण सोलापुरात का होत आहे राष्ट्रवादीच्या नजीब शेख यांचे कौतुक
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. आता पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापुरातील राजूर गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 160 हून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. अब्दुल हाफिज जुनेदी यांच्या टीमने ही तपासणी केली. उद्या मंगळवार आणि बुधवार रोजी हे शिबीर सुरू राहणार आहे.
या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी सभापती अशोक देवकते, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल- मेहराज आबादीराजे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला हा उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरला.