सोलापूर झेडपीत बाबासाहेब मोठे की बाहेरून आलेले गायक ; बातमी देणाऱ्यावर कास्ट्राईब संघटना संतापली !
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव साजरी झाला. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन झाले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर ही बातमी ज्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याने लिहिली आणि ती माध्यमांना दिली. त्याच्यावर कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर प्रचंड संतापले आहेत.
या बातमी सोबत फोटो अभिवादनाचा द्यायला पाहिजे होता परंतु त्याने बाहेरून आलेल्या गायकांच्या सत्काराचा फोटो सर्वत्र दिला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याची प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे तिथे बाहेरून आलेले गायक जाणीवपूर्वक त्या कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांचा अभिवादनाचा फोटो माध्यमांना दिला नाही असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. बातमी लिहिताना सुद्धा हा कर्मचारी कंत्राटी असताना मुद्दामहून मोठ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे खाली घालतो आणि स्वतःचं नाव वर घेतो हे कायम पाहायला मिळते त्यामुळे तो जातीद्वेष करत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.