शहर उत्तर मधून सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी ; भाजपवर या शब्दात टीका
सोलापूर : सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जाणारा शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या याच्यानंतर आणि उत्तर मधील भारतीय जनता पार्टीचे लीड तोडण्यात काँग्रेस यशस्वी झाला त्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये या मतदारसंघाबाबत आशा निर्माण झाले आहे.
वडार समाजातील युवा नेते सीए सुशील बंदपट्टे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाकडे शहर उत्तर मधून उमेदवारी मिळण्याची मागणी केली मागणी अर्ज शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे सादर केला.
यावेळी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे, मनोज एलगुलवार, अशोक देवकते, हेमा चिंचोळकर, वर्षा आतनुरे, देवा गायकवाड, राजा कलकेरी, भारत निंबाळकर, गजेंद्र निंबाळकर, माजी नगरसेवक चौगुले, गोपीचंद मुदगल, अशोक यमपुरे, महेश अलकुंटे, सदाशिव मुद्दे, मनोज विटकर, संतोष इरकल, दिपक जाधव, भीमाशंकर बंदपट्टे, कुणाल धोत्रे, संदीप म्हेत्रे, कुणाल भांडेकर, श्रीनिवास यमपुरे, अंकुश बंदपट्टे यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशील बंदपट्टे म्हणाले, शहर उत्तर साठी आज पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात काम करतोय, उत्तर मध्ये पक्ष रुजविण्याचे काम मी केले आहे, मागील वीस वर्षापासून या भागाचा विकास झाला नाही, अनेक प्रश्न आहेत, ते सोडविले गेले नाहीत, हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मी उमेदवारी मागितली आहे.