सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”
सोलापूर : दारू प्यायला पैसे न दिल्याचा राग मनात धरून सोलापुरात एका युवकाने हातात चाकू आणि सत्तूर घेऊन धिंगाणा घालत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयराब चॉदसाब जमादार, वय ३७ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आलम ऊर्फ शाहरूख म. इसाक तांबोळी रा-सरवदे नगर मुळेगाव रोड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना चार ऑक्टोबर रोजी रात्री सातच्या सुमारास सग्गम नगर या भागात घडली.
फिर्यादी हा पाकिजा मटन शॉम समोर उभा असताना यातील अरोपीत मजकूर हा तेथे आला व फिर्यादीस दारू पिण्यास पैसे मागितले असता फिर्यादीने त्यास पैसे देण्यास नकार दिला असता त्यांचा राग मनात धरून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीवर लोखंडी सत्तुरने वार केला त्याचबरोबर दि ०६/१०/२०२५ रोजी ०८.३० वा चे सुमारास आरोपीने सग्ग्म नगर रोड वर फिर्यादीस त्यांचे हातातील लोखंडी चाकू दाखूवन तेरे को खत्म करता नाही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता असे म्हणून तेथेनू निघून गेला आणि तेथे जमलेले लोकांना सत्तुर दाखवून कोणी सोडवायला आले तर त्यानाही खल्लास करेन अशी धमकी देवून आरोपीने तेथे दहशत निर्माण केली आहे.