सोलापुरात १ कोटींची भव्य सांस्कृतिक उभारणी ; ‘विकास हा आमचा धर्म’; आंबेडकर चळवळीचा ऐतिहासिक आरंभ






सोलापूर – प्रभाग क्रमांक २२ च्या विकासाचा नवा इतिहास लिहिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सक्रिय सहकार्याने रामवाडीला तब्बल १ कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण धडपडीचे हे फलित असून, आंबेडकरी समाजासाठी हा दिवस विकासाचा निर्णायक टप्पा ठरला.
या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या दोन भव्य प्रकल्पांना प्रत्येकी ५० लाखांची भक्कम तरतूद करण्यात आली असून, या दोन्ही योजनांचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.
दरम्यान यावेळी रामवाडी परिसरातील श्रद्धास्थान अंबाबाई मंदिरात तुळजापूरच्या तुळजाभवानी इतकेच भक्तांची आढळ श्रद्धा असून या देवीचे अण्णा बनसोडे यांनी मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर इच्छा भगवंताची परिवारातर्फे क्रेन द्वारे अण्णा बनसोडे यांचे भव्य हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले “राष्ट्रवादी पुन्हा” या गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी निनाद करत उत्साहन शिगेला पोहोचवला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, प्रदेश सचिव इरफान शेख, आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड, संजय भडंगे, सुनील कांबळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, शामराव गांगर्डे, पंचशीलक मंडळाचे प्रमुख सागर कांबळे, संतोष उर्फ ऋतिक गायकवाड, दीपक गायगवळी, महात्मा फुले प्रशालेचे संस्थापक गायकवाड मामा, राजू जाधव, शोभा गायकवाड, लक्ष्मी कांबळे, मीना गायकवाड, सरोजनी जाधव,प्रमिला स्वामी, योजना कामतकर, पिंटू जाधव, उत्तम कदम, बाशा शेख, श्याम जाधव, सिकंदर शेख, कोशेन कुरेशी, रवींद्र गायकवाड, डॉली जाधव, माऊली जरग, वृषभ पेटी, वसंत कांबळे, माणिक कांबळे, फिरोज पठाण, सचिन अंगडीकर आदींसह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य उपस्थिती होती.
निधीचे महत्त्व अधोरेखित करताना अण्णा बनसोडे म्हणाले, प्रभाग २२ च्या विकासाचे घोडे वेगाने धावण्यामागे जाधव–गायकवाड यांची तळमळ आहे. त्यांच्या जिद्दीमुळेच आंबेडकरी समाजाला आधुनिक, दर्जेदार सांस्कृतिक पायाभूत सुविधा मिळत आहेत. विकास आणि सर्वधर्मीयांची एकजूट हीच राष्ट्रवादीची खरी ओळख आहे.
यावेळी बोलताना किसन जाधव यांनी रमाई घरकुल योजनेतील जाचक अटी तातडीने शिथिल करून वास्तविक गरजू लाभार्थ्यांना मदत मिळावी, अशी सकारात्मक मागणी अण्णा बनसोडे यांच्याकडे केली.
तसेच प्रभागात आणखीन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.



















