सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी
सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा राग मनात भरून पतीने तिच्या प्रियकरासमोर चाकूने छातीत वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच सोबत असलेल्या प्रियकराला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मी विनोद सरवदे, वय-२५ वर्षे, राहणार सध्या तेलघाणा सोसायटी मोकळे मैदान मर्दा मंगल कार्यालयाच्या बाजूला लक्ष्मी मंदिर समोर, अक्कलकोट रोड सोलापूर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विनोद नामदेव सरवदे राहणार जोशी गल्ली याच्या विरोधात होणार दाखल झाला आहे.
फिर्यादी व फिर्यादीचा प्रियकर मनोज चौगुले असे दोघे मंगळवार 29 एप्रिल 2025 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास एमआयडीसी मधील अनंत तारा लोन शेजारील चौकात रिक्षाची वाट बघत थांबले असताना फिर्यादीचा पती यातील आरोपीत मजकूर यांने त्यांच्या बुलेट मोटार सायकलवरून त्याठिकाणी येऊन “तुझ्याशी दोन गोष्टी बोलायचे आहेत” असे फिर्यादीस बोलून फिर्यादीस बाजूला घेऊन “तू माझ्यासोबत राहणार नसशील तर, मी तुला कोणासोबतच राहू देणार नाही, आता मी तुला संपवतो” असे म्हणून त्यांच्या जवळील चाकू काढून फिर्यादीचे छातीत दोन वेळा खुपसून तसेच डाव्या हातावर वार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस गंभीर जखमी केले तसेच प्रियकर मनोज चौगुले यास हातातील चाकू दाखवून तु जर आमच्या मध्ये आलास तर तुला पण संपवतो अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे या करीत आहेत.