

साठे पाटील वस्ती शिवसेनेच्या पाठीशी एकवटली ! मनोज भाईजींच्या पॅनलला प्रचंड प्रतिसाद
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना उमेदवारांना दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून गुरुवारी रात्री साठे पाटील वस्तीमध्ये झालेल्या जाहीर सभेत अख्खी वस्ती शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सभेत शिवसेना उमेदवार मनोज शेजवाल, नागेश गायकवाड, अनिता गवळी, पूजा चव्हाण तसेच त्यांच्या पॅनलला साठे पाटील वस्तीतील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला.
साठे पाटील वस्तीत कार्यरत असलेल्या आणि परिसरातील सर्वात मोठ्या सर्वोदय नवरात्र महोत्सव मंडळाने शिवसेना उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. तसेच साठे पाटील वस्तीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दोन अपक्ष उमेदवारही शिवसेनेच्या पॅनलच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
अपक्ष उमेदवार बाबू बोधगोळू आणि राधाताई गोलोलू यांनी जाहीरपणे शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देत एकजुटीचे दर्शन घडवले. यामुळे प्रभाग क्रमांक ६ मधील राजकीय समीकरणे शिवसेनेच्या बाजूने झुकताना दिसत आहेत.
मनोज शेजवाल, नागेश गवळी गायकवाड, पूजाताई चव्हाण आणि त्यांच्या शिवसेना पॅनलला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर विश्वास व्यक्त केला जात आहे. या जाहीर पाठिंब्यामुळे शिवसेनेचा प्रचार अधिक बळकट झाला असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे.





















