सोलापुरात खा.प्रणिती शिंदे खांद्यावर नांगर घेऊन मोर्चा सहभागी ; महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांसाठी संग्राम ; विराट मोर्चाने वेधले लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही, भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवारी विराट असा संग्राम मोर्चा काढण्यात आला.
चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून हा मोर्चा रवाना झाला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर समोरून पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले.
या मोर्चात खासदार प्रणिती शिंदे या खांद्यावर प्रत्येकात्मक नांगर सहभागी झाल्याने त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चामध्ये शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन सहभागी झाले. कार्यकर्त्यांच्या हातात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक होते.
मोर्चात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे, भारत जाधव, राजशेखर शिवदारे, अशोक निंबरगी, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, शितल म्हेत्रे, जुबेर कुरेशी, विनोद भोसले, नजीब शेख, मनोज यलगुलवार, संजय हेमगड्डी, सुदीप चाकोते, बाळासाहेब शेळके, हरीश पाटील, बाबा करगुळे, भीमाशंकर जमादार, फिरदौस पटेल, प्रमिला तूपलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, भारत जाधव, नलिनी चंदेले, सर्फराज शेख, अक्षय वाकसे धर्मराज काडादी, शिवसेनेचे प्राध्यापक अजय दासरी, महिला आघाडीच्या सीमा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.