जर मशिदीतून फतवे निघणार असतील तर सातपुतेंसाठी हिंदू संत हिंदू जागरण अभियान राबविणार
सोलापूर : शांतीसागर मंगल कार्यालयात महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ हिंदू संतांची बैठक पार पडली, याप्रसंगी नागपूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहाळे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
जर मशिदीतून फतवे निघणार असतील तर आम्ही सर्व हिंदू संत देखील ज्यांच्या नावात राम आहे अशा राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी हिंदु जागरण अभियान राबविणार असल्याचे हिंदू संतांनी निर्धार घेतला.
याप्रसंगी हिंदू पुरोहित संघटनेच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्यांनी 500 वर्ष झोपडीत असणाऱ्या आमच्या आराध्य दैवत प्रभू श्रीरामांना भव्य दिव्य मंदिरात विराजमान केले अशा युग पुरुष नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनविणे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.





















