सोलापुरात 9 दिवस आंबेडकर जयंती उत्सव ; 21 एप्रिलला मिरवणूक ; मध्यवर्ती अध्यक्षपदी नागेश रणखांबे
सोलापूर : विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव व विश्वस्त समितीची नियोजन बैठक रविवारी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावर पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश_रणखांबे यांची तसेच कार्याध्यक्ष व्यंकटेश भंडारे, सचिव प्रा.संघमित्रा चौधरी, खजिनदार अमोल धेंडे, ऑडिटर अनिल सोनकांबळे यांची निवड करण्यात आली.
बैठकीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी बोलताना मिरवणुकीच्या वेळेस जाणीवपूर्वक काही मंडळ वाटेत जास्त वेळ थांबतात त्यामुळे मागच्या मंडळांना पुढे जाता येत नाही यावर यंदाच्या उत्सवात मध्यवर्ती विश्वस्त समितीने ठोस भूमिका घ्यावी पोलीस प्रशासनाशी बोलावे अशी मागणी केली.
सोलापूर शहरात 9 दिवसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल त्यानंतर 21 एप्रिल रविवार रोजी भीम जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय झाल्याची माहिती राजा सरवदे यांनी दिली.
सुभानजी बनसोडे, राहुल सरवदे, राजा इंगळे, रवी गायकवाड, एडवोकेट संजीव सदाफुले, सुबोध वाघमोडे, अजित गायकवाड, अरुण भालेराव, श्रीशैल गायकवाड, प्रवीण निकाळजे, सुशील सरवदे, शशी कांबळे, राजा कदम, शिवम सोनकांबळे, पिंटू ढावरे, संध्या काळे, प्रमिला तूपलवंडे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.