सुलेरजवळगे येथे प्रजासत्ताक दिनाचा प्रंचड उत्साह ; झेडपी शाळेच्या मुलांचा बहारदार कलाविष्कार
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय समितीचे अध्यक्ष रविकांत बगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


गावात ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद प्राथमिक व कन्नड मराठी शाळेच्या वतीने भरदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला कलागुणांना वाव देत कलाविष्कार सादर केला. पालकांसह ग्रामस्थांनी यावेळी मोठी दाद दिली.
खरंतर अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाण्याचा कल बदलून इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढलेला आहे. पण अलीकडच्या काळात दर्जेदार शिक्षणाबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. दर्जेदार शिक्षणाबरोबर आता सांस्कृतीक आणि क्रीडा या क्षेत्रात आता जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी मोठे यश संपादन करीत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक पण मोठी मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळते.