सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल
सोलापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतर्यावर नग्न अवस्थेत चढणाऱ्या एका चाळीस वर्षीय इसमाला हटकून खाली घेत असताना तो इसम त्या युवकांच्या अंगावर आला तेव्हा झालेल्या झटापटीत आणि मारहाणीत त्या चाळीस वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या त्या दोन युवकांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोकॉ अतुल लक्ष्मण रिकीबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
सुरज सुरेश सुरवसे, रा. मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर व प्रशांत दत्तात्रय मरगणे, रा. अवंती नगर, सोलापूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
०३/०९/२०२५ रोजी पहाटे ०४.१० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चबुतऱ्यावर एक अनोळखी नग्न अवस्थेतील इसम अंदाजे वय ४० वर्षे, हा चढल्याचे कारणावरुन त्यास खाली घेत असताना तो अंगावर गेल्याने सुरज सुरवसे याने लाकडाने मारहाण करुन खाली उतरवत असताना तो चबुतऱ्यावरुन खाली पडला त्यावेळी खाली उभारलेल्या प्रशांत मरगणे याने त्यास लाथाबुक्याने मारहाण केल्याने मयत झाला आहे म्हणून फिर्यादीची वरील आरोपीतांविरुध्द सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.