सोलापुरात काँग्रेसच्या मनोहरने केले 500 लोकांना अन्नदान
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर सचिव मनोहर चकोलेकर यांनी शहरांमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या गोरगरीब लोकांना वाटप केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पासपोर्ट कार्यालय यादरम्यान शेकडो बेघर नागरिक रस्त्यावर असतात त्या सर्वांना त्यांनी अनुदान केले. चकोलेकर यांनी या महामानवांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.